HW News Marathi
क्राइम

१७ दिवसांनंतर आज जामिनावर आर्यन खान येणार कोठडीतून बाहेर?

मुंबई | ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यन खान केसची आज सुनावनी आहे. जामिनावर त्याची सुटका होण्याची शक्यता आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनावर न्यायालय आज सुनावणी करणार आहे. आर्यन खान क्रुझ रेव्ह पार्टी ड्रग्स प्रकरणात तुरुंगात आहे. आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. एनसीबीने १४ ऑक्टोबर रोजी बॉ आर्यन खानच्या जामीन अर्जाला विशेष एनडीपीए न्यायालयात विरोध केला आणि दावा केला की तो ड्रग्सचा नियमित ग्राहक आहे. क्रूझ पार्टीदरम्यान ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी आर्यन खानला अटक करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप चॅटचा हवाला देऊन षड्यंत्रात सहभागी असल्याचा आरोप

आर्यन खान आणि अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स अॅक्ट (एनडीपीएस) प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांच्या न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांनी एनसीबीचे म्हणणे मांडले. आर्यन खान गेल्या काही वर्षांपासून मादक पदार्थांचा नियमित ग्राहक होता हे दाखवणारे पुरावे आहेत, असे अनिल सिंह यांनी म्हटले होत. यासह, त्यांनी आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटचा हवाला देऊन षड्यंत्रात सहभागी असल्याचा आरोप पुन्हा केला.एनसीबीने तीन ऑक्टोबरला आर्यन खानला अटक केली होती. जामीन न मिळाल्याने आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात आले.

आर्यनला एन ९५६ हा नंबर अंडरट्रायल कैदी म्हणून मिळाला. आर्यन खानला कारागृहातील त्याच्या घरातून ४५०० रुपयांची मनीऑर्डरही मिळाली आहे. यासह, तो कॅन्टीनमधून त्यांच्या आवडीचे अन्न आणि पेय मागवू शकतो. इतके दिवस घरापासून दूर असलेल्या आर्यन खानला व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्या पालकांशी बोलण्याची संधीही मिळाली आहे. आर्यनच्या अटकेपासून, एनसीबी म्हणत आहे की त्याच्याकडून वैयक्तिकरित्या काहीही मिळाले नाही. मात्र, ड्रग्ज तस्करांशी त्याचे संबंध व्हॉट्सअॅप चॅटद्वारे उघड झाले आहेत. एएसजीने पुढे सांगितले की, क्रूझमधील अरबाज मर्चंटकडून जप्त केलेले अंमली पदार्थ आर्यन आणि मर्चंटसाठी होते. आर्यनचे आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करांच्या सदस्यांशी संबंध असल्याचा दावा एनसीबी करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बँक आॅफ महाराष्ट्राची रोकड लुटली

News Desk

सलमान खाननी ‘या’ कारणासाठी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

Aprna

सिमेंट गोदामावरील दरोडा फसला आणि पकडला गेला; कसं पकडलं पोलिसांनी?

Chetan Kirdat