मुंबई । मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाकडून गुरूवारी (२८ ऑक्टोबर) जामीन मंजूर झाला. परंतु, न्यायालयाच्या निकालाची प्रत न आल्याने २८ आणि २९ ऑक्टोबरची रात्री देखील आर्यनला तुरुंगातच काढावी लागली. मात्र, आज म्हणजे ३० ऑक्टोबरला अखेर आर्यन खानची सुटका होणार आहे. जामीन आदेशाची प्रत एनडीपीएस न्यायालयातून आर्थर रोड कारागृहात पोहोचली असल्याने आता थोड्याच वेळात आर्यन खानसह अन्य दोन आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचीही तुरुंगातून सुटका होणार आहे.
आर्यनच्या सुटकेची कागदपत्रं आज शनिवारी सकाळी जामीन पत्राच्या पेटीत टाकण्यात आली आहेत. दरम्यान, सकाळी ९ नंतर आर्यनच्या सुटकेची प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे १० वाजल्यानंतर ही आर्यन तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. गुरुवारी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर शुक्रवारी सत्र न्यायालयात आर्यनची जामीनपत्र भरण्याची कार्यवाही पूर्ण झाली. मात्र, जामिनाची कागदपत्रे आर्थर रोड कारागृहातील जामीन पेटीत वेळेवर जमा होऊ न शकल्याने आर्यनची सुटका शनिवारपर्यंत पुढे ढकलली गेली होती.
एकूण १४ अटींवर जामीन मंजूर
आर्यनच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एकूण १४ अटी घातल्या आहेत. आर्यन खानला पोलिसांना न कळवता शहर सोडता येणार नाही, त्याला दर शुक्रवारी एनसीबीसमोर उपस्थित राहावं लागेल, त्याचप्रमाणे या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करता येणार नाही. त्याचप्रमाणे, जामीन आदेशानुसार एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक जमा करावा लागेल आणि पासपोर्टही जमा करावा लागेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.