HW News Marathi
महाराष्ट्र

“मीडिया म्हणून मलाही तुमचा आवाज सक्षम वाटत नाही”, मुंडे संतापल्या माध्यमांवर!



बीड। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी देखील आज पत्रकार परिषद घेतली. आणि दुसरीकडे त्यांच्या भगिनी असलेल्या अर्थातच खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनीदेखील पत्रकार परिषद घेतली आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्याच्या राजकारणात मोठी बहीण अर्थात पंकजा मुंडे नेहमीच आक्रमक पण पाहायला मिळतात तर दुसरीकडे प्रीतम मुंडे या त्यांच्या मवाळ स्वभावामुळे परिचित आहेत. मात्र आज या उलट सगळी परिस्थिती पाहायला मिळाली, याच प्रीतम मुंडे आज पत्रकारांवर चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना प्रीतम मुंडे आक्रमक झाल्या आणि चक्क पत्रकारांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्य प्रश्नाकडे फिरवली पाठ

तर आजच्या पत्रकार परिषदेत प्रीतम मुंडे यांना माध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आले की, बीड जिल्ह्यात देवस्थानच्या जमिनीत मोठा गैरव्यवहार झालाय. तुम्ही मंदिर उघडावेत यासाठी आग्रही होता आणि त्यानंतर सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिली. मात्र त्याच मंदिरांच्या हडप केलेल्या जमिनीसाठी आपण आंदोलन करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. यावर खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या, की जिथे जिथे अन्याय होताना दिसतो, तिथं तिथं आवाज उचलेन. हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते आम्ही निश्चित करू’. असं सांगत मुख्य प्रश्‍नाकडे मात्र खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळाली. परंतु मुंडे यांच्याकडून प्रश्नाचे योग्य उत्तर न आल्याने पत्रकारांकडून पुन्हा प्रश्न विचारण्यात आला. आणि डॉक्टर खासदार प्रीतम मुंडे चक्क पत्रकारावर संतापलेल्या पहायला मिळाल्या.

प्रीतम नेमकं काय म्हणाल्या?

‘ऑन द रेकॉर्ड आणि ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला कसं वाजवायचं तसं वाजवा. खासदार म्हणून जशी माझी जबाबदारी, तशीच पत्रकार म्हणून तुमची जबाबदारी आहे. असं प्रीतम मुंडे म्हणाल्या तर तर पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला खासदारांचा आवाज सक्षम वाटत नसेल तर मला माफ करा, मीडिया म्हणून मलाही तुमचा आवाज सक्षम वाटत नाही’, अशा भडकलेल्या शब्दात प्रीतम मुंडे यांच्याकडून पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यात आले आहे. म्हणून आता तो चर्चेचा विषय ठरतोय.

आज इथं कोण कुणाच्या हातचं बाहुलं

राज्यात लैंगिक अत्याचाराचा मुद्दा गंभीर आहे. बीड जिल्ह्याची मान खाली जात आहे. या सरकारमध्ये दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न अनुत्तरित आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसंच पक्ष म्हणून बेदखल केलं जातं की नाही हे मला माहिती नाही. पण आज इथं कोण कुणाच्या हातचं बाहुलं आहे हे सर्वांना माहिती असल्याचा टोलाही प्रीतम मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना लगावलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली!

News Desk

“अरे बापरे मला भीती वाटतेय…पण सामना वाचायला लागलात चांगली गोष्ट आहे!”

News Desk

“वाझे लादेन आहे म्हणणाऱ्या मुख्मंत्र्यांनी राजीनामा द्यावा”, निलेश राणेंची मागणी

News Desk