HW News Marathi
Covid-19

राज्यातील निवासी डॉक्टरांना आता ९ दिवस काम आणि ६ दिवस क्वारंटाईन सुट्टी

मुंबई। राज्यातील निवासी डॉक्टरांना संदर्भ वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने मोठ्या दिलासा दिला आहे. निवासी डॉक्टरांना ९ दिवस काम आणि ६ दिवस सुट्टी आहे. निवासी डॉक्टरांना ६ दिवस सुट्टीही क्वारंटाईन राहावे लागणार, अशा पद्धतीने काम करावे लागणार आहे. याआधी निवासी डॉक्टारांना ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी, या कामाच्या वेळेत आता बदल मार्डने आक्षेप नोंदवल्यानंतर हा निर्णय मागे घेतले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सरकारी रुग्णालायांमध्ये निवासी डॉक्टर काम करत आहे. राज्यातील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आहे. यामुळे रुग्णालयात मनुष्यबळ कमी पडू लागले आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या ७ दिवस काम आणि ७ दिवस सुट्टी, अशी कामाची वेळ काही दिवसांपूर्वी बदलण्यात आली होती. पण, नवीन बदलानुसार ५ दिवस काम आणि २दिवस सुट्टी असे बदल करण्यात आले. या बदलानंतर निवासी डॉक्टरांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली होती.

डॉक्टरांचा थेट कोरोना रुग्णांची संपर्क थेट आल्याने संसर्ग होण्याची भीती आहे. यावेळी डॉक्टरांना लक्षणे समजण्यासाठी किमान ५ दिवस क्वारंटाईन असणे गरजेचे आहे. अशावेळी दिवसाच्या सुट्टीत, क्वारंटाईनमध्ये लक्षणे कसे समजणार, असे म्हणत मार्डने यावर आक्षेप घेतला होता. यावर मार्डने उपाय म्हणून ९ दिवस काम आणि ८ दिवस सुट्टी (क्वारंटाईन) देण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार आता वैद्यकीय शिक्षण विभागाने आता ९ दिवस काम आणि ६ दिवस क्वारंटाईन असे बदल केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज 63 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

आपण सध्या कोरोनाच्या नव्या अन् धोकादायक टप्प्यावर, WHO चा इशारा 

News Desk

सार्वजनिक वाहतूक सुरू होणार – नितीन गडकरी

News Desk