मुंबई। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या दोन दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. आणि या दौऱ्यात ममता यांनी राजकीय मंडळींच्या भेटीघाटी घेतल्या. यात महत्वाची भेट मानली जाते ती म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट, शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीत भाजपविरोधात तिसरा पर्याय देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी पवार यांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. इतकंच नाही तर यूपीएबाबत विचारलेल्या प्रश्नावर कुठे आहे यूपीए? आता यूपीए नाहीये. यूपीए काय आहे? असा प्रतिसवाल ममता यांनी केला. ममता दिदीचा याच विधानाचा धागा पकडत आशिष शेलार यांनी काँग्रेसवर आता चांगलीच टीका केलीये.
काँग्रेसला बुद्धी असेल तर त्यांनी विचार करावा
पवांच्या उपस्थित ममता बॅनर्जी म्हणाल्या की यूपीए संपली, याचा काँग्रेसनं विचार करायला हवा का? असा सवालही आशिष शेलार यांना करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसला बुद्धी असेल तर त्यांनी विचार करावा. याचं कारण काँग्रेसला स्वत:च्या अस्तित्वाबद्दलच उभं राहिलं पाहिजे याबद्दलचा प्रश्न मनात पडत असेल तर ते जनतेसमोर काय मांडणार? अशी गंभीर टीका देखील भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेसवर केलीय.
या गुप्त बैठकीमध्ये कटकारस्थान तर नाही ना? @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/iq2R581tRz
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 1, 2021
बॅनर्जी यांनी काय काँग्रेस विसर्जित केली आहे का?
पुढे बोलताना भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, ‘जे स्वत: पराभूत आणि नकारात्मक वृत्तीमध्ये आहेत. त्यांनी भाजपला पराभूत करण्याच्या भूमिकेवर चर्चा करु नये. जे दुबळे आहेत, कमजोर आहेत, त्यांनी दुसऱ्याच्या विरोधात लढण्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. लोकशाहीत निवडणुका येतील तेव्हा नक्की या, एकटे या नका येऊ. मुळामध्ये यूपीए संपली म्हणजे ममता बॅनर्जी यांनी काय काँग्रेस विसर्जित केली आहे का? काँग्रेसला हे मान्य आहे का? आणि काँग्रेसविरोधात अशी घेतलेली भूमिका ही शिवसेनेच्या समर्थनावर घेतली आहे का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा त्यांना करावा लागणार आहे. असे एक ना अनेक आरोप ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरून शेलारांनी केले आहे.
काँग्रेसशिवाय एकजूट विरोधी पक्ष शक्य नसल्याचे स्पष्ट
शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीचा धागा पकडत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी काँग्रेसशिवाय एकजूट विरोधी पक्ष शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, ममता दीदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, त्या पवारसाहेबांना भेटणार आहेत. बैठकीनंतर त्या पत्रकारांना संबोधित करून चर्चेची माहिती देतील.जेव्हा मलिक यांना विचारण्यात आलं की टीएमसी या क्षणी काँग्रेसला बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे का? तेव्हा त्यांनी सांगितलं की तृणमूल पश्चिम बंगालच्या बाहेर आपला पाया स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक पक्षाला हा अधिकार आहे. पण काँग्रेसला बाहेर ठेऊन भाजपच्या विरोधात एकसंध विरोधक उभारणे हे जवळपास अशक्यप्राय काम आहे. असं वक्तव्य आता महाविकासआघाडीतील मंत्री नवाब मलिक यांनी केल आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.