HW News Marathi
महाराष्ट्र

‘खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार’, आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

नंदुरबार। भाजप आमदार आशिष शेलार हे नेहमीच ठाकरे सरकारवर टीका करत असतात. राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारच वर्णन ‘खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार’ असंच कराव लागेल, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी खास अहिराणी भाषेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. आशिष शेलार आजपासून तीन दिवसाच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नंदुरबार जिल्हा दौऱ्यात संघटनात्मक आढावा घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला. काल(३ ऑगस्ट) नंदुरबारमधील जनतेचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या.

नंदुरबारसारख्या अतीदुर्गम भागात कधी आणि कसे पोहचणार?

आशिष शेलार नंदुरबार दौऱ्यावर आहेत. तेव्हा त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. एका अभद्र युतीतून कंत्राटावरचे कट कमिशनसाठी एकत्र आलेले हे तीन पक्षांचे ठाकरे सरकार आहे. जे गेल्या दोन वर्षात मंत्रालयात ही पोहचू शकले नाही. जे अजूनही मंत्रालयात पोहोचले नाहीत ते नंदुरबारसारख्या अतीदुर्गम भागात कधी आणि कसे पोहचणार? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

नंदुरबारमध्ये यावेळी पाऊस पुरेसा झालेला नाही. दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसत आहे. २० जुलैपर्यंत ३ लाख ५ हजार हेक्टरपैकी १ लाख हेक्टरपर्यंत पेरणी झाली. मात्र, पावसानं दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागत आहे. पीक कर्ज देण्यात बँकांनी आखडता हात घेतला आहे. २० हजारापेक्षा जास्त खातेधारकांनी कर्ज घेतलेले नाही अशी अवस्था आहे. जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचे नियोजन हे सरकार कधी करणार? असा प्रश्नही शेलार यांनी विचारलाय.

मंदिरं बंद पण पब, बार सुरु अशी अवस्था

महाराष्ट्रात काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यावरून आता ठाकरे सरकार विरोधकांच्या कचाट्यात सापडले आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना सूट द्या असं न्यायालय सांगत आहे. पण हे सरकार काय नियम लावतं त्याचा ताळमेळ नाही. मंदिरं बंद पण पब, बार सुरु अशी अवस्था आहे. प्रत्येकजण वेगवेगळी विधान करतात. सरकारच्या तीन पक्षांत बेदीली असल्याने एकवाक्यता नाही. सरकार जनतेबाबत गंभीर नसल्याची टीकाही शेलार यांनी केली आहे.

पुरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजबाबत विचारलं असता शेलार म्हणाले की, मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मग त्यांनी शब्द फिरवला का? याआधी तौक्ते आणि निसर्ग वादळावेळी घोषित केलेलं पॅकेज अद्याप जनतेपर्यंत पोहोचलं नाही. तातडीची १० हजाराची मदत मिळालेली नाही. घोषित होत पण पोहोचत नाही, अस ठाकरे सरकारच पॅकेज असतं. या संकटाची व्याप्तीही अजून सरकारच्या लक्षात आलेली नाही. जनतेला मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे, असं शेलार म्हणाले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘MPSC ला जागा देण्यास २ वर्षे’, रोहित पवारांच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

News Desk

‘गोसीखुर्द’च्या पाण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

Aprna

“खासगी कामासाठी सरकारी विमानाने प्रवास का केला?”, हायकोर्टाचा राऊतांना सवाल

News Desk