HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप?

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोठी सरकारनं वीज बचत व्हावी व पर्यावरण पूरक म्हणून मुंबईत एलईडी दिवे लावण्यास सुरुवात केली, तेव्हा क्वीन नेकलेसची शोभा जाईल, असे म्हणण्यात आले होते. हे जे ओरडत होते त्यांनी क्वीन नेकलेसच आता तोडला त्याचे काय? असा सवाल करीत हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा असल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप? असा खोचक सवाल देखील आशिष शेलार यांनी शिवसेनेला केला आहे.

अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच! पण..आता क्वीन नेकलेसची माळ हे तोडून टाकत आहेत. क्वीन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय? आता पारसी गेट तोडलाच…समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार, अशी जहरी टीका अशिष शेलार यांनी केली आहे. आता या परिसराची शोभा घालवली जाणार आहे.

आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप? असा सवाल देखील आशिष शेलार यांनी केली आहे. झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड? मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या “ढोंगीपणाचा गाळ” दिसला ना अशा सूचक शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

Related posts

छिंदम मारहाण प्रकरणी सेनेच्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

News Desk

पवारांच्या साताऱ्यातील बैठकीत शिवेंद्रराजेंची हजेरी, चर्चांना उधाण

News Desk

जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल तर…

News Desk