HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मराठा आरक्षणामागे राजकीय षडयंत्र, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

मुंबई | राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. लोकांना न्याय मिळणे तर दूरचे पण या विषयात आता राजकरण सुरू झाले आहे. मराठा आंदोलनात राजकीय लोक घुसले असून त्यांना मराठा आणि ओबीसी असा वाद लावायचा आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

“मराठा आरक्षणाबाबत काही पक्षांकडून राजकीय षडयंत्र केलं जातंय ज्यांना ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावून त्याचा राजकीय फायदा उठवायचा आहे. आंदोलन करताना त्यात कुठल्या कुठल्या पक्षांची लोक आलेली आहेत हा संशोधनचा विषय आहे. जे समजाकरीता प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, त्यांना बदनाम करण्याकरता ते यात घुसले आहेत. प्रामाणिकपणे आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढली पाहिजे. आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे पण ते तुम्ही कोणाविरुद्ध करत आहात हा मूळ प्रश्न आहे. जिथं ओबीसी विरुद्ध मराठा हा प्रश्नच येत नाही तिथं तो कसा आला? यामागे राजकीय षडयंत्र आहे.

Related posts

बॉलिवूड इंडस्ट्री मुंबईबाहेर नेणे हे काय खिशातलं पाकीट मारण्याइतकं सोपं आहे का? योगींचा सवाल

News Desk

भाजपने राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही – सचिन सावंत

News Desk

मधुकर कुकडेंनी घेतली शरद पवारांची भेट  

धनंजय दळवी