HW News Marathi
महाराष्ट्र

“मी तसं म्हणालो नाहीच!” निधीच्या विधानावरुन अशोक चव्हाणांचा युटर्न

नांदेड | मी तसं म्हणालोच नाही, तिथेही निधी मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचे मी सांगितले, असे म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे. काँग्रेसच्या महापालिकांना निधी दिला जात नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. मी तसं म्हणालो नसल्याचं सांगत अशोक चव्हाणांनी एकप्रकारे हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

काय म्हणाले होते अशोक चव्हाण?

“काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,” असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत दाखल झाले. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजेंनी राजीनामा देऊन तेथील लोकांना त्रास देऊ नये !

News Desk

पोलीस बदली प्रकरणी फडणवीसांचा जबाब नोंदविला; थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार

Aprna

‘सत्ता आज आहे, उद्या नाही… सत्तेचा एवढा माज बरा नव्हे’

News Desk