मुंबई | हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू असलम खान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते ९० वर्षांचे होते. असलम यांना शुगर, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा त्रास होता. काही दिवसांपूर्वीच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.
Aslam Khan, younger brother of veteran actor Dilip Kumar passed away early morning today. He had diabetes, hypertension and ischaemic heart disease and had tested positive for #COVID19: Lilavati Hospital, Mumbai #Maharashtra
— ANI (@ANI) August 21, 2020
असलम खान यांचे भाऊ एहसास खान हे देखील लीलावती रुग्णालयामध्ये भरती आहेत. एहसास खान देखील कोरोना संक्रमित आहे. दरम्यान एहसास यांची तब्येत देखील गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. एहसास यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.