HW News Marathi
Covid-19

‘मुंबईचे पालकमंत्री कोरोना पाॅझिटिव्ह’ ट्विट करत दिली माहिती

मुंबई | मुंबईतील कोरोना परिस्थिती सध्या सुधारत आहे. मुंबईमध्ये कोरोना रूग्ण बरे होण्याच्या दर ७०टक्क्यांच्या पुढे आहे. मात्र आता मुंबईकरांसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.

कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी ट्विट केले आहे की,माझी कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची कोणतेही लक्षण नाही मी स्वत:ला Isolate केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी अशा मी विनंती करतो.याकाळात मी माझ्या लोकांसाठी घरूनच काम करत राहीन.’

राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. राज्याचा आकडा लाखांच्या पुढे गेला आहे. याआधीसुद्धा राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,सार्वजनिक बांधकामावर मंत्री अशोक चव्हाण आणिसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे.या तिनही नेत्यांनी कोरोनावर मात केली आणि ते कामाव रूजू झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बच्चन यांना कोरोनाची लागण तर अभिनेत्री रेखा यांचा बंगला सील !

News Desk

कस्तुरबाने कोरोनाबाधितांना कोरोनामुक्त करण्यात गाठली ‘शंभरी’

News Desk

अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना बैठक सुरु  

News Desk