HW News Marathi
महाराष्ट्र

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रखुमाईचं मंदिर आकर्षक फुलांनी सजलं!

कोरनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखिल आषाढी एकादशी काही निर्बंधात पार पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह आज आज शासकीय महापुजा केली.

आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर शहर हे दिवशी लाखो वारकऱ्यांनी फुलून जातं, मात्र, यंदा विठुरायालाही आपल्या लाडक्या भक्तांचं दर्शन झालेलं नाही.

कोरोनाचं सावट जरी असलं तरी विठुरायाच्या गाभाऱ्याला अनेक फुलांनी सजवलं आहे.

विविध प्रकारच्या गुलाबांनी विठ्ठल रखुमाईचा गाभारा सजवण्यात आला आहे. या फुलांमध्ये देवाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

गुलाब, जाई-जुई, मोगरा, शेवंती अशी अनेक फुलं आणि फळांची सजावट आजच्या या दिवशी मंदिरात करण्यात आली आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यासोबत मंदिरातील खांबही अशाच पद्धतीने सजवण्यात आले आहेत.

तिरंगी फुलांच्या सजावटीत विठ्ठलाचं हे लोभसवाणं रुप अत्यंत मनमोहक दिसत आहे.

याही वर्षी कोरोनामुळे देवाचा गाभारा भक्तांविना आणि वारकऱ्यांविना असा सुनासुनाच होता.

पायी वारी सोहळ्याला परवानगी मिळावी यासाठी यंदा अनेक वारकरी नेत्यांनी प्रयत्न केले. यासाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजेही ठोठावण्यात आले. परंतू वारकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.

शासकीय पुजेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यावरचं कोरोनाचं संकट टळू दे आणि पुन्हा एकदा पंढरपूर वारकऱ्यांनी तुडुंब भरलेलं पहायला मिळू दे अशी प्रार्थना विठ्ठलाचरणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ३१५ कोटींच्या निधीला मंजुरी

Aprna

राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीठीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

swarit

OBC आरक्षणावर सोमवारी नवे विधेयक विधिमंडळात मांडण्यास कॅबिनेटची मान्यता; भुजबळांची माहिती

Aprna