HW News Marathi
महाराष्ट्र

कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींवर दारुड्यांचा हल्ला

पुणे | कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याने झालेल्या वादातून जखमी झाल्या आहेत. काल (६ जून) संध्याकाळी हा प्रकार कोथरूड परिसरात घडला. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

काय आहे प्रकरण?

काल संध्याकाळी कोथरूड येथील सहजानंद सोसायटीच्या प्रवेशद्वारावर काही तरुण दारू पित बसले होते. यावेळी सोसायटीतील एक नागरिक कुत्रा बाहेर निघून निघाले होते. त्यांनी या टोळक्याला येथे बसू नका म्हणत हटकले. त्यानंतर या टोळक्याने संबंधित नागरिकासोबत कुत्रा अंगावर सोडतो का म्हणत वाद घातला. त्यामुळे घाबरलेला हा नागरिक पुढे निघाला असता त्यातील एकाने त्यांच्या दिशेने बाटली फेकून मारली. यावेळी दोन तरुण भांडण सोडविण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही या टोळक्याने मारहाण केली.

गोंधळ सुरू असलेल्या ठिकाणी माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि सोसायटीतील इतर नागरिकही पोहोचले. परंतु दारूच्या नशेत असलेले हे टोळके काही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यांनी सर्वांना धक्काबुक्की करत बघून घेऊ अशी धमकी देखील यावेळी दिली. या दरम्यान झालेल्या झटापटीत मेधा कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ जखम झाली. एका महिलेने याप्रकरणी तक्रार दिली असून कोथरूड पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली.

घडलेल्या प्रकारावर बोलताना त्या म्हणाल्या, कोथरूड परिसरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून स्पष्ट होते. मारामारी, छेडछाड, किरकोळ कारणावरून गाड्यांची तोडफोड अशा घटना या परिसरात नित्याच्या झाल्या आहेत. आजच्या घटनेतही आरोपी पळून जात असताना पोलीस काहीच करू शकले नाही. पोलीस समोर उभे असताना संबंधित तरुण अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होते. यावरून त्यांना कुठलेच भय नसल्याचे स्पष्ट होते. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता उद्धव ठाकरेही करणार नव्या घरात गृहप्रवेश

News Desk

NCBच्या चौकशीत काय सुरू आहे याचा तपशील माध्यमांना माहिती कसा मिळत आहे? सचिन सावंतांचा प्रश्न

News Desk

झोपेत असताना सरकार जाईल हे वक्तव्य पाटलांनी जागेपणीचं केलं ना?, अजित पवारांचा पलटवार

News Desk