HW News Marathi
देश / विदेश

देशाचे हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष, ‘भाजप’ची ताकद पणाला

मुंबई । संपूर्ण देशाचे लक्ष आता हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. दरम्यान, दुपारी 4 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार टीआरएस (TRS) 66, भाजप 34 आणि एआयएमआयएम (AIMIM) 37 जागांवर आघाडीवर आहे. खरंतर सुरुवातीच्या काही कलांमध्ये भाजप आघाडीवर होता. मात्र, त्यानंतर टीआरएसने (TRS) भाजपला मागे टाकत मोठी आघाडी घेतली. दरम्यान, असे असले तरीही या निकालांनी भाजपला मोठा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. या निवडणुकीत एकीकडे भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे एआयएमआयएम मोठा धक्का बसला आहे.

भाजपने या हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी खरंतर आपली मोठी ताकद पणाला लावल्याचे पाहायला मिळाले. या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने देशात पहिल्यांदाच भाजप संपूर्ण तयारीनिशी उतरल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यापासून ते योगी आदित्यनाथ त्याचप्रमाणे महाराष्ट्र भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. याच पार्श्वभूमीवर, हैदराबादचा महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपला यश मिळणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इन्स्टाग्राम फीचर्स बदलणार

News Desk

कोरोनापासून सावध राहा, इसिसने दिल्या दहशतवाद्यांना सूचना

swarit

अरविंद केजरीवाल घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

swarit