HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांपासून राज्यातील महिला असुरक्षित, रक्षकच बनले भक्षक – अतुल भातखळकर

मुंबई | पुण्यातील वादग्रस्त पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपने महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. भाजपनं आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री राठोडगिरी सहन करणार का? असा सवाल केला आहे. पुजा चव्हाण हीच्या आत्महत्येत विदर्भातल्या एका मंत्र्याचं कनेक्शन असल्याची चर्चा होत आहे. त्यालाच भातखळकरांनी उघडपणे नाव घेत राठोडगिरी असं म्हटलं आहे.

काय आहे अतुल भातखळकरांचे ट्विट?

मुळची परळीची असलेल्या पुजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली आहे. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली आहे. पुजा चव्हाणनं विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा होती. त्याची चौकशी करा म्हणून भाजपच्या पुण्यातल्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षांनी आयुक्तांना निवेदनही दिलं आहे. पण संबंधित मंत्र्यांचं थेट नाव कुणीही घेतलेलं नव्हतं. ना ते तक्रारीत आहे ना, कुठे एफआयआरमध्ये. पण आता भाजपा त्या मंत्र्याचं नाव उघड करताना दिसते आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुळची परळीची असलेली २२ वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी गद्दार नाही, शिवसेनेचा खरा गद्दार अनिल परब आहे!; रामदास कदमांचा सवाल

Aprna

कृषी, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा क्षेत्रासाठी अमेरिकेने आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करावे! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

पेट्रोल-डिझेलनंतर आता एसटीची भाडेवाढ?

News Desk