HW News Marathi
महाराष्ट्र

“आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा, नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला

मुंबई | राज्याच्या राजकारणात अनेक विषयांवरुन विरोधक आणि सत्ताधारी सरकार यांच्यात वाद सुरु असतात. आता कर्नाटक-महाराष्ट्र मुद्यावरुन राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही, तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या मागणीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावला आहे. आधी तुमच्या राज्यात असलेल्या औरंगाबादचं संभाजीनगर तर करा, असं खोचक ट्वीट अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर केलं आहे. “बेळगावचा समावेश केंद्र शासित प्रदेशात व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जरूर करा, परंतु त्या आधी तुमच्या हाती असलेल्या राज्यात औरंगाबादचे संभाजीनगर तर करा. नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा”, असा खोचक टोलो अतुल भातखळकरांनी केला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

‘बेळगावचा समावेश केंद्र शासित प्रदेशात व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जरूर करा, परंतु त्या आधी तुमच्या हाती असलेल्या राज्यात औरंगाबाद चे संभाजीनगर तर करा.. नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा’, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

‘बेळगावचा समावेश केंद्र शासित प्रदेशात व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जरूर करा, परंतु त्या आधी तुमच्या हाती असलेल्या राज्यात औरंगाबाद चे संभाजीनगर तर करा.. नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा’, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावली

News Desk

आर्यन खानचा एनसीबी कोठडीमधील मुक्काम दोन दिवसांनी वाढला

News Desk

सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर यांच्यावर पुढील उपचार मुंबईत होणार

News Desk