HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला बळी, तर सात वर्षाची मुलगी पॉझिटिव्ह

औरंगाबाद | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्य झाला आहे. हा व्यक्ती ३ एप्रिल रोजी या व्यक्तीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. ५८ वर्षीय व्यक्तीचा त्याच रात्री स्वॅब घेण्यात आला होता. मात्र, त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची रिपोर्टमधून काळाले. यानंतर आज (५ एप्रिल) दुपारी साडेबारा वाजता त्यांचा मृत्यू झाला. यामुळे आता राज्यातील कोरोनाबळींची संख्या ३६ वर पोहोचली आहे. मृत रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब होता, त्रास होत होता.

औरंगाबादमध्ये आज कोरोनाग्रस्तांची संख्या ५ वरून ८वर केली आहे. पाचही कोरोना रुग्णांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. धक्कादायबाब म्हणजे औरंगाबादमध्ये दोन वर्षाच्या आणि ७ वर्षाच्या मुलींना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. याव्यतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या चालकालाही करोनाची लागण झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाहीये”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावले!

News Desk

औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? सेना- काँग्रेसमध्ये नामंतरावरून वाद 

News Desk

‘अनिल परबांचं बेकायदेशीर कार्यालय पाडण्यास सुरुवात होणार’, किरीट सोमय्या यांची माहिती!

News Desk