HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे

मुंबई | औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्नी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यानंतर औरंगाबाद परिक्षेत्राचे आयजी मिलिंद भारंबे यांनी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे.

मिलिंद भारंबे यांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पोलीस आयुक्त पदाची सुत्रे स्वीकारली आहेत. दरम्यान, या प्रकरणी दंगल नियंत्रण पथकात काम करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. कपिला मद्वेमवार, रतन धानूरे, किसन मार्कंडे, असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटरवर झाले ‘लखपती’

News Desk

“बुस्टर डोस मला माहित नाही पण, हा मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल”, राऊतांचा भाजपला टोला

Aprna

धनंजय मुंडे यांनी अपघातग्रस्त तरुणाचे वाचवले प्राण

Aprna