HW News Marathi
महाराष्ट्र

तडीपार गुंडाचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो व्हायरल

औरंगाबाद | २ वर्षापासून औरंगाबाद मधून तडीपार असलेल्या गुंडासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. या तडीपार गुंडाचे नाव राहुल साहेबराव चाबुकस्वार असून औरंगाबादमधील हुसेली कॉलनीचा रहिवासी आहे. औरंगाबाद शहरातील जवाहर नगर, मुकुंदवाडी आणि एम. सिडको पोलीस ठाण्यात त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न करणे यासारख्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गुंडा राहुल चाबुकस्वर यांनी स्वत:च्या फेसबुकवर हा फोटो शेअर केला आहे. चाबुकस्वार त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून औरंगाबाद पोलिसांनी त्यांना गेल्या २ वर्षासाठी तडीपार केले आहे. चाबुकस्वार यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो कधी आणि कुठे काढला आहे. या बद्दल अत्याप कोणाला माहिती मिळाली नाही. मात्र तडीपार गुंडासोबत मुख्यमंत्र्यांचा फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जवळपास १६ तासांनी बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचविण्यात यश

News Desk

योजनेतर्गत योजनांचे तांत्रिक मान्यतेचे राज्यस्तरीय अधिकार जिल्हा पातळीवर हस्तांतरित करण्याबाबत सकारात्मक! – अजित पवार

Aprna

‘राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आक्रमक!’

News Desk