HW News Marathi
महाराष्ट्र

दिलासादायक ! औरंगाबादमध्ये आज आणखी ६ जण कोरोनामुक्त

औरंगाबाद | औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आज (२० एप्रिल) तेराव्या दिवशी कोरोनाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या ६ जणांना सामान्य जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहितीचे घाटीचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे.

दरम्यान, औरंगाबादमधून काल (१९ एप्रिल) ५ जम कोरोनामुक्त झाले होते. तर, आज ६ त्यामुळे या दोन दिवसात ११ कोरोनाबाधित कोरोनामुक्त होऊन घरी गेल्याने औरंगाबादच्या नागरिकांनी थोडा का होईना पण सुटकेचा श्वास सोडला आहे. आत्तापर्यत औरंगाबादमध्ये ३१ कोरोनाबाधित आढळले होते. त्यातील ३ जणांना मृत्यू झाला आहे. मात्र, आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या ६ जणांचा महापौर नंदकुमार घोडले यांनी स्वागत केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा-कोरेगाव | पाच जणांची नजरकैद कायम

News Desk

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांचे निधन

News Desk

12 आमदारांचा तिढा सुटणार? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलवलं भेटीला!

News Desk