HW News Marathi
महाराष्ट्र

#AyodhyaHearing : अयोध्या सुनावणीदरम्यान मुस्लीम पक्षांच्या वकीलाने फाडला नकाशा

नवी दिल्ली | गेल्या तीन दशकांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागेल्या अयोध्या प्रकरणाची सुनावणी आज (१६ ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. या प्रकराणाच्या सुनावणीदरम्यान नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाली. यात राम मंदिरवर हिंदू महासभेच्या वकिलांनी ऑक्सफोर्ड पुस्तकातील नकाशाचा हवाला दिला. यावेळी मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी या पुस्तकाचा नकाशा फाडला. त्यामुळे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नाराजी व्यक्त केली.

मात्र, या प्रकरणी सुनावणी आजच पूर्ण होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले. रंजन गोगोई म्हणाले, ‘पुरे झाले आता, सुनावणी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण होईल.’ या प्रकरणाच्या युक्तिवादाचा आजाच शेवटचा दिवस आहे.

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा काल ३९ वा दिवस होता. अयोध्या प्रकरणातील सर्व पक्षकारांनी त्यांचा युक्तीवाद आज पूर्ण करणार असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी अखेरच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात १० अयोध्येत डिसेंबरपर्यंत कलम १४४लागू करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना १७ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्रवीर सावरकरांसाठी एकदिवसीय उपोषण

News Desk

ड्रग्ज प्रकरणात खोट्या माहितीच्या आधारे मला गोवण्याचा कट; वानखेडेंचं पोलीस आयुक्तांना पत्र

News Desk

मेहबूब शेख यांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे आमदार खंबीरपणे उभे राहिले 

News Desk