HW News Marathi
देश / विदेश

देशात पुढची १० ते २० वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाही !

मुंबई । “पुढची १० ते २० वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाही”, असा आत्मविश्वास योगगुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे. “मी मोदींचा भक्त नाही पण एक राष्ट्रभक्त नक्कीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील राष्ट्रभक्त आहेत. राहुल गांधी यांनी त्रियोग करावा तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा. कारण, देशात पुढची १० ते २० वर्षे त्यांना काहीही पर्याय नाही”, असा सल्ला देखील यावेळी बाबा रामदेव यांनी काँग्रेसला दिला आहे. ते News 18 ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“कोट्यवधी लोकांना पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. मोदी आणि इतर राजकारण्यांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. संपूर्ण देशाला हे माहिती आहे की मोदींना स्वतःसाठी काहीही नकोय. त्यांना जे काही करायचं आहे ते देशासाठी करायचं आहे. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रभक्त आहेत म्हणून मी त्यांचा सहयोगी आहे. प्रभू कृपेने त्यांना हे सगळं काही मिळालं आहे”, असे म्हणत बाबा रामदेव यांनी या मुलाखतीत पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

“मोदीभक्त” म्हणून आपल्यावर होणाऱ्या टिकेवर स्पष्टीकरण देताना बाबा रामदेव असेही म्हणाले की, “मी मोदीभक्त नाही, राष्ट्रभक्त आहे. मी प्रभू, गाव, गरीब, मजूर, शेतकरी, दलित, शोषित, वंचित, मागासवर्गीय लोकांना भक्त आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवरच राज्याची वाटचाल सुरु ! । उपमुख्यमंत्री अजित पवार

News Desk

श्रीनगरमधील बाजारात ग्रेनेड हल्ला, १५ जण जखमी तर एकाचा मृत्यू

News Desk

‘मेडल मोदीजींनी आणलंय का?’ ऑलिम्पिक पदक विजेत्या बॉक्सरने व्यक्त केली नाराजी

News Desk