HW Marathi
महाराष्ट्र

बाबा सिद्दीकीची ४६२ कोटी संपत्ती जप्त ईडीची कारवाई

मुंबई | काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) घोटाळ्या प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. ईडीने कारवाई करत वांद्रे येथील सिद्दीकी यांच्या कंपनीचे ३३ फ्लॅट्स जप्त करण्यात आले आहे. या फ्लॅट्सची सध्याची किंमत जवळपास ४६२ कोटी रुपये इतकी आहे.

पिरॅमिड डेव्हलपर या कंपनीची ही सर्व मालमत्ता असून झोपडपट्टी पुनर्वसन योजना अतिरिक्त निर्देशांक (एफएसआय)मध्ये घरे मिळवण्यासाठी खोटी कागद पत्रे सादर केल्याचा आरोप कंपनीवर केला आहे. वांद्रे येथील एसआरए योजनेतील घोटाळ्याच्या आरोपांचा तपास करताना कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. २००० ते २००४ या कालावधीत एसआरए प्रकल्पापूर्तीच्या वेळीस सिद्दकी हे म्हाडाचे अध्यक्ष होते.

या कंपनीने खोटी कागद पत्रे तयार करुन जास्तीचे फ्लॅट पदरात पाडून घेतले. सिद्दीकी आणि बिल्डर यांच्या संगनमत करुन काही लोकांना हाताशी घेऊन फसवणूक करण्यास भाग पाडले. त्या जागेवर एक आलिशान इमारत बांधून त्यातील फ्लॅट विकून मोठा नफा कमवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप सद्दीकीवर आहे.

स्थानिक कोर्टाने २०१४मध्ये वांद्रे पोलिसांनी बाबा सिद्दीकीसह १५८ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ईडीने तपास सुरु केला आहे.

Related posts

कोल्हापूर-सांगलीमधील महापुरामुळे मुंबईसह ठाण्यातील दंहीहडी रद्द

News Desk

लॉकडाऊनच्या काळात सायबर २५८ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

News Desk

नांदेड, परभणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागांची अशोक चव्हाणांकडून पाहणी

News Desk