HW News Marathi
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील बाबरवस्ती शाळा आदर्श पुरस्काराने सन्मानित

सांगली । वर्षानूवर्षे दुष्काळाचा सामना करत जगणारी, वर्षातील सहा महीने ऊसतोडणीसाठी गावापासून दुर राहणारी कुटूंब, अशी परिस्थिती सांगली जिल्ह्यातील गावात नेहमीच असते. अशा या परिस्थितीतही सांगली जिल्हयातील पांडोझरी गावातल्या बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला आदर्श शाळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या शाळेतील गुणवत्ता पटात सतत होणारी वाढ, ज्ञानरचनावाद, इंग्रजी,मराठी लेखन, वाचन, वृक्ष संगोपन, वृक्ष रोपन,बोलक्या भिंती अशा विविध उपक्रमातुन शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहे. छोट्याशा गावात वाडी-वस्तीवर शाळेमध्ये चाललेल्या या कार्याची शिक्षक संघटनेच्या वतीने दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.

श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय नेमीनाथनगर, सांगली येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती आदर्श शाळा पुरस्कार देऊन या शाळेचा गौरव करण्यात आला. अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी सांगली, शामरावजी जवंजाळ राज्याध्यक्ष म.रा.मागासवर्गीय शिक्षक संघटना,संगीता खोत महापौर म.न.पा.सांगली, यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, एस.एम.सी.अध्यक्ष, सदस्य व पालक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

शाळेच्या वतीने महाराष्ट्र राज्य मागासर्गीय शिक्षक संघटनेचे आभार मानण्यात आले. शाळेची प्रगती पांडोझरी गावातील शिक्षण प्रेमी नागरिक, पालक,पदाधिकारी, शिक्षक, यांच्या सांघिक प्रयत्नातून झाली असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच हा एका शाळेचा सन्मान नसून सांगली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळात सुरू असणाऱ्या उत्तम कामाचा सन्मान असल्याची भावना शाळेच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्यावरण मंत्र्यांची दिशा चुकली, मग आता वनमंत्री पूजा घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत, नितेश राणेंचा प्रहार  

News Desk

अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालं, फडणवीस-पवारांच्या शपथविधीवरुन राऊतांचा टोमणा 

News Desk

गृहमंत्री अनिल देशमुख यांची तात्काळ हकालपट्टी करा, भाजपची मागणी

News Desk