HW News Marathi
महाराष्ट्र

तर मी भाजपमध्ये जाऊन त्यांची सेवा करेन – बच्चू कडू

अहमदनगर | केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले तर मी भाजपमध्ये जाण्यास तयार आहे, असा खळबळजनक दावा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. अहमदनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बच्चू कडू यावेळी म्हणाले की, शेतकऱ्यांना ५०% नफा धरून हमी भाव द्यायला पाहिजे आणि शेतमाल खरेदीची हमी सरकारने घेतली पाहिजे. केंद्र सरकारने कृषी कायद्यांमध्ये या दोन सुधारणा केल्यास मी भाजपमध्ये जाऊन त्यांची सेवा करेन.

या आधीही बच्चू कडू यांनी भाजपमध्ये प्रवेश करेन असे म्हटले होते. बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली कृषी कायद्यांवरील भूमिका मांडली आहे. “कृषी कायद्यासंदर्भात शिवसेनेची भूमिका भाजपसोबत असतानाही याच पद्धतीने होती. जिथं खरं होतं तिथं उभी राहिली. आमचं असं मत आहे की, बिलामध्ये दुरूस्ती करायला हवी. बिल जसंच्या तसं स्वीकारायला आम्ही तयार आहोत. मोदीजींची जर ५६ इंचची छाती असेल, तर ५६ इंच छाती स्वीकारतो. फक्त दोन ओळी त्यात टाका की, ५० टक्के नफा धरून भाव काढू आणि ५० टक्के नफा धरून जो भाव निघेल तशी खरेदी करू. इतक्या दोन ओळी टाका. गरज पडल्यास आम्ही भाजपात प्रवेश करू,” असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

दरम्यान यावेळी बिहार निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, बिहार निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हवं तेवढं यश मिळालं नाही. निवडणुकीत कमी-जास्त सुरु राहतं, मात्र भाजपला मोठं यश मिळालेलं नाही. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांत असंतोष आहे. हा कायदा लागू केल्यापासून काँग्रेससह मित्रपक्ष सातत्याने त्याचा विरोध करत आहेत. राज्यातही काँग्रेसने कृषी कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून काँग्रेसची राज्यभरात आंदोलनं सुरु आहेत. महाराष्ट्र सरकारने कृषी कायद्याविरोधात भूमिका घेतलेली नाही अथवा त्यास पाठिंबादेखील दर्शवलेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिवेशनच नाही तर 1000 कोटींचे नवे संसद भवन कशाला? संजय राऊतांचा मोदींना सवाल

News Desk

रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरु व्हावी असे नियोजन करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Manasi Devkar

“आता मला वाटतं की आम्ही एकही सामना गमावणार नाही”, मोटेरा स्टेडियमवरुन मुख्यमंत्र्याचा टोला

News Desk