HW News Marathi
महाराष्ट्र

वेशांतर करून बच्चू कडू थेट पोहोचले महानगरपालिकेत

मुंबई। पालकमंत्री आणि जनतेचे कैवारी बच्चू कडू नेहमीच आपल्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत असतात. ते नेहमीच आपल्या कामाला प्राधान्य देत असतात आज बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांचं काम पाहण्यासाठी एक डावच रचला होता, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी आज अकोला शहर व पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना वेशांतर करून भेट दिली होती.

बच्चू कडू यांनी युसुफखाँ हे नाव धारण करून वेशांतर केले. यानंतर त्यांनी अकोला महानगरपालिकेला भेट दिली. तिथे त्यांनी विविध विभागांची पाहणी करत कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधला. मात्र, एकही मनपा कर्मचारी बच्चू कडू यांना ओळखू शकला नाही.

दरम्यान, बच्चू कडू मनपामध्ये गेल्यानंतर मनपा आयुक्त निमा अरोरा त्यांच्या कक्षात नव्हत्या. यामुळे कडू यांनी स्वीय सहाय्यकाशी संवाद साधला. स्वीय सहायक देखील कडू यांना ओळखू शकले नाहीत. मनपाचा कारभार पाहिल्यानंतर बच्चू कडू तेथून निघून गेले. मात्र, ते निघून गेल्यानंतर पालकमंत्री वेशांतर करून आले होते, हे समजताच मनपा परिसरात मोठी खळबळ उडाली आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

त्यानंतर बच्चू कडू पातूर शहरात गेले. शहरात देखील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांना भेटी देत शासकीय कार्यालयातील माहिती जाणून घेतली तसेच शहरातील स्वस्त धान्य दुकानांना देखील बच्चू कडू यांनी भेटी देत सारं काही जाणून घेतलंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Aprna

मराठा आरक्षण प्रकरणात आता पार्थ पवारांची उडी!

News Desk

‘या’ अधिवेशनात ‘दिशा’ विधेयक नाही

swarit