HW News Marathi
Covid-19

“मोदींनी देशात योग्य नियोजन केलं असतं तर…”, बच्चू कडूंचे केंद्रावर टीकास्त्र

अहमदनगर | देशात कोरोनाची स्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. मोदी सरकारला यावरुन न्यायालयानेही सुनावले असताना आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही मोदींवर हल्लाबोल केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या भूमिका बजावायला पाहिजे होत्या, त्या त्यांनी बजावल्याच नाही. त्यामुळे आज जी आपत्ती आली आहे ती देशासोबत राज्यावर येऊन पडली आहे. देशात जर योग्य नियोजन झाले असते तर आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते,” असा जोरदार हल्लाबोल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल (१२ मे) अहमदनगरला प्रहार कोव्हिड सेंटरची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. त्यासोबतच राज्यातील लसीच्या तुटवड्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी शाब्दिक हल्ला केला आहे.

“देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रमुख आहेत ते मोदींकडे गेले का? आम्हाला लसीकरण जास्त द्या किंवा इतर साहित्य द्या असे एक तरी निवेदन त्यांनी पंतप्रधानांना दिले का? असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रात राहून सरकारवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा ते केंद्रातून काय आणू शकले याचे उदाहरण देवेंद्रजींनी द्यावे, मग त्यांना बोलायचा अधिकार आहे”, असा टोला त्यांनी लगावला आहे.

“केंद्राने महाराष्ट्राला सर्वात जास्त लस दिल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. देवेंद्रजी तुम्ही आकडे समोर घेऊन बसलात तर तुमच्या लक्षात येईल, असे प्रत्युत्तर बच्चू कडूंनी केले. केंद्राकडून जे काही मिळते त्यात दुजाभाव होतोय. त्यावर आम्ही बोललो, पण कुठल्या वादात पडलो नाही. आज देशात सर्वात चांगले व्यवस्थापन हे महाराष्ट्रात केलं जातं आहे. तसेच मुंबईचे तर जागतिक पातळीवर कौतुक होतं आहे. जरी केंद्र सरकार दुजाभाव करत असेल तरी राज्य मात्र खंबीर आहे. सध्या इतर राज्यापेक्षा आपली स्थिती बरी आहे”, असेही बच्चू कडू म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी योग्य भूमिका बजावली नाही – बच्चू कडू

“पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक महिना अगोदर स्टेटमेंट पहिल तर देशातून कोरोना गेल्याचं ते बोलले होते. एक महिन्यानंतर कोरोना जगाच्या पाठीवर सर्वात जास्त आपल्या देशात आहे. पंतप्रधान म्हणून त्यांनी ज्या भूमिका बजावायला पाहिजे होत्या त्या त्यांनी बजावल्याच नाही. त्यामुळे आज जी आपत्ती आली आहे ती देशासोबत राज्यवर येऊन पडली. देशात जर नियोजन झाला असतं, तर आज हे दिवस आपल्याला पाहिला मिळाले नसते”, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची राज्य शासनाची रेल्वेला विनंती

News Desk

रात्रभरात पुण्यात ५५ रुग्ण आढळल्याने खळबळ, रुग्णांची संख्या १३१९वर पोहोचली

News Desk

दिल्ली सरकार मद्यावरील ७० टक्के कोरोना शुल्क १० जूनपासून हटविणार

News Desk