HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर

ठाणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर झाला आहे. नर्सेस आंदोलन प्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलिसांनी जाधव यांना अटक केली होती. वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांना आधी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना ३१ जुलै रोजी अटक करण्यात होती. ठाणे दिवाणी न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज ३ ऑगस्टला फेटाळण्यात आला होता, मात्र ठाणे सत्र न्यायालयाने ७ दिवसानंतर जामीन मंजूर केला आहे.

https://www.facebook.com/613056469196665/posts/988529881649320/

 

अविनाश जाधव यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याचे मनसेचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितले आहे. “न्यायालयावर आमचा विश्वास आहे, अविनाश जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे असून लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी कोविडसाठी आंदोलन केले होते. त्यामुळे जनतेसाठी ही लढाई होती. पुढेदेखील अशीच लढाई जनेतेसाठी सुरू राहील” असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना ताब्यात घेतले. महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्या प्रकरणी अविनाश जाधव हे आंदोलन करत होते. वसई पालिका आयुक्त दालनात आंदोलन केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.अविनाश जाधव यांना पुढील दोन वर्षांसाठी तडीपार होण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. पाच जिल्ह्यांतून तडीपार होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्लॅकमेल करणारे आरटीआय पाठवणे देशभरातल्या अनेकांचा उद्योगच आहे |

swarit

‘ICHR ने पंडित नेहरुंचं चित्र वगळलं’, त्यावर संजय राऊत म्हणाले….

News Desk

“बॅनरवर ‘विकासपुरुष’ लिहिल्याने…”, रोहित पवारांचा भाजपला टोला!

News Desk