HW News Marathi
महाराष्ट्र

‘बजरंग पुनियाचा धमाकेदार विजय’, कुस्तीत कांस्यपदक!

टोकियो। टोकियो ऑलिम्पिकमधून भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची वाढ झाली आहे. भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे. बजरंगने कझाकस्तानचा कुस्तीपटू याचा 8-0 अशा एकतर्फी अंतराने पराभव केला आहे. बजरंगने दौलेत नियाझबेकोव्हला 65 किलो वजनी गटात अस्मान दाखवलं. बजरंगने हा सामना जिंकल्याने भारताने या टोकियो ऑलिम्पिकमध्ये 6 वं पदक पटकावलं आहे.

कांस्यपदकाशी लढत

भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत झाली. कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोवशी लढत होती. बजरंग पुनिया या मॅचमध्ये पहिल्यापासून सकारात्मक खेळ करताना दिसून आला. पहिल्या राऊंडमध्ये बजरंग पुनियाला 2-0 अशी आघाडी मिळाली होती. प्रतिस्पर्धीखेळाडू सुरुवातीपासून नकारात्मक खेळ करताना दिसून आला.बजरंग पुनियानं कांस्य पदक मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देशातील राजकीय नेत्यांनी अभिनंदन केलं आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने सुवर्ण पटकावलं होतं

अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीनं गौरव

25 वर्षीय बजरंग आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. जागतिक क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे. नुकतंच त्याने आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये त्याने 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे, तर राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने सुवर्ण पटकावलं होतं. केंद्र सरकारने त्याचा अर्जुन पुरस्कार आणि यंदा ‘पद्मश्री’ने गौरव केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा

News Desk

प्रवीण जाधवला आंतराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण मिळणार!

News Desk

मुंबईला विभाजीत करण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुख संमती, आशिष शेलारांचा आरोप

News Desk