HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीदिनी गर्दी करु नका, संयम पाळा, मुख्यमंत्र्याचे आवाहन!

मुंबई | हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या (१७ नोव्हेंबर) स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर न जाण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे. यावेळी राज्यभरातून शिवसैनिक दादर येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात. पण कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासन आणि पालिकेतर्फे देखील महत्वाची पाऊलं उचलण्यात आली आहेत. स्मृतीस्थळावर न जाता घरातून, कार्यालयातून बाळासाहेबांना मानवंदना देण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

तुमच्या भावना आणि श्रद्धा मी समजू शकतो. पण यावेळेस संयम पाळावा लागेल. कुणीही गर्दी करु नये. शिवसेनाप्रमुखांचे तुमच्या ह्रदयातील स्थान मला माहित आहे. मात्र, तुम्ही जिथे आहात तिथूनच शिवसेना प्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी स्मृतीस्थळावर जाऊ नका असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वच्छ सर्व्हेक्षणात सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून ‘महाराष्ट्र’ देशात अव्वल

News Desk

यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात न होता ‘या’ ठिकाणी होणार…

News Desk

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत केली वाहनांची जाळपोळ

News Desk