HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकरी कायद्यानिमित्त होणारी बाळासाहेब थोरात आणि राज्यपालांची भेट रद्द

मुंबई | महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. हे पाटील हे कोरोनाबाधित झाल्याने खबरदारी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे आज राज्यपालांना भेटणार नाहीत.दरम्यान, त्यांच्याऐवजी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्यावेत या मागणीचे निवेदन देणार आहेत.

महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील हे गेल्या आठवड्यात एक दिवस मुंबईत होते. पाटील यांनी राज्यातील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकही घेतली होती. या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख यांच्यासह अनेकजण या मिटींग उपस्थितीत होते. त्यानंतर एच.के.पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे पाटील यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ पुस्तकात महाराजांचा किंचितही अपमान झालेला नाही !

News Desk

वांद्रे पूर्व परिसरात इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू तर ७ जण जखमी

News Desk

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लिन चिट

News Desk