रायगड | महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रायगड दौर्याला अलिबाग तालुक्यातून सुरुवात झाली. त्यांनी नागांवमध्ये निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच काही नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही केले.
निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान केले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज (१३ जून) जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. अलिबाग तालुक्यात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम नागांव येथील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली.
थोरात यांनी नागाव येथील नुकसानीची पाहणी केली. तसेच वादळग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी नागाव ग्रामपंचायतीमधील काही नुकसानग्रस्त नागरिकांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले.
रायगड जिल्ह्यात #निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन मदतकार्याची पाहणी केली. नुकसान झालेल्या परिवारास मदतीचे धनादेश दिले. कोकण म्हणजे नंदनवनच आहे. चक्रीवादळामुळे कोलमडून पडलेले हे नंदनवन पुन्हा उभे करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. pic.twitter.com/McuuoUpct8
— Balasaheb Thorat (@bb_thorat) June 13, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.