HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात – बाळासाहेब थोरात 

मुंबई  | केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. त्यांना हरियाणाच्या सीमेवर अडवून त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, कृषी कायद्यांचा एक विषय आहे, इतरही मागण्या आहेत, त्याचा केंद्र सरकारनं विचार करण्याची गरज आहे, असे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

पुढे ते असेही म्हणाले की, तो जो काही कृषी कायदा केलेला आहे. तो कोणालातरी फायदा व्हावा या हेतूने केलेला आहे. शेतकऱ्यांना काय शहरातील नागरिकांना देखील त्रासदायक ठरवणारा हा कायदा आहे. देशातील फक्त पंजाब आणि हरियाणा नाही तर देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारनं सहानुभूतिपूर्वक विचार करावा.आज देशातील राज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, असे थोरात म्हणाले आहेत.

Related posts

अयोध्या प्रकरणातील १८ पुर्नविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

News Desk

भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या गाडीला अपघात

News Desk

राम मंदिर अयोध्येत नाही तर काय मक्का मदिनेत होणार ?

News Desk