HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार-अमित शहा भेटीवर कॉंग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अहमदाबादमधील भेटीचं वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून फेटाळण्यात आलं आहे. मात्र भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे या भेटीची चर्चा कायम आहे. राज्यात कोणतीही नवी समीकरणं अस्तित्वात येणार नाहीत असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. यादरम्यान या घडामोडींवर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एबीपी माझाशी बोलताना यासंबंधी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “अशा बातम्यांना आम्ही फार महत्व देत नाही. राष्ट्रवादीने देखील यासंबंधी स्पष्ट खुलासा केला आहे. रात्रीच मी पवारांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोललो. त्यांनीदेखील मुद्दामून हा विषय काढला आणि कसे लोक भेद, गैरसमज निर्माण करत असल्याचं सांगितलं. त्यांना भेटायचं असतं तर दिल्लीत सर्वांची घरं आहेत तिथेही भेटू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचं वेगळं काही असेल असं मला वाटत नाही”. “विरोधी पक्ष काही खडे टाकण्यात यशस्वी होतो आणि मीडियाकडून तो विषय उचलला जातो. वस्तुस्थिती वेगळी असते आणि मीडियामध्ये वेगळं सुरु असतं,” असंही यावेळी ते म्हणाले.

“संजय राऊत हे एका बाजूला राजकारणी आहेत. आघाडी सरकार होण्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याचं आम्ही जाहीरपणे सांगत असतो. पण ते संपादकही आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यामध्ये त्यांची गल्लत होते का काय असं वाटून जातं. तीन पक्ष एकत्र असताना आणि चांगलं काम करत असताना त्यांना बळ देणं त्यांचं काम आहे. असं वक्तव्य करुन मनात दोष निर्माण होतो हे त्यांनी करु नये,” असं स्पष्ट मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.“अशा वक्तव्यामुळे नाराजी होत असते.

जेव्हा आघाडीचे प्रमुख एकत्र येतो तेव्हा यावर साहजिकच चर्चा होते. आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे, आम्ही घटकपक्ष आहोत. सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सोनिया गांधी आणि शरद पवारांमध्ये चांगले संबंध असून असं वक्तव्य करुन भेद निर्माण करण्याची काही गरज नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांनंतर राज्यातील राजकीय घडामोडींवर वेग आला आहे. मोठ्या सुरु आहेत. त्यातच महाविकास आघाडीतील एका पक्षाच्या नेत्यांनी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याबरोबर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

दरम्यान, जर शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली असेल तर राज्यात असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारवर त्याचा काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.राज्यात येत्या काळात नवीन समीकरणं तयार होणार का? महाविकास आघाडीची सत्ता जाणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्योगांशी संबंधित धोरणातच भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षण-प्रशिक्षणाचा समावेश करा! – मुख्यमंत्री

Aprna

‘दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी ६ टीएमसी पाणी देण्याचे आदेश ‘-जलसंपदामंत्री जयंत पाटील

News Desk

भाजप खासदार उदयनराजे भोसले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

News Desk