HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत, त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, थोरतांनी ठणकावले

मुंबई | औरंगाबाद शहराच्या नमांतरावरुन राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरवर सीएमओला धारेवर धरत सुनावले आहे. “माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही”, असं बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगितलं आहे

“महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे”, अशी भूमिका थोरात यांनी मांडली आहे.

छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया”, असं आवाहन थोरात यांनी केलं.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असं देखील थोरात यांनी म्हटले आहे.

 

काँग्रेसचा विरोध

शिवसेनेच्या या मागणीला राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसनं विरोध केला. नाव बदलणं हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपण आमच्या आयुष्यात खास आहात, संजय राऊत यांच्या मुख्यमंत्र्यांना खास शुभेच्छा!

News Desk

आ. महेंद्र दळवींच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्यातील पेण मधील शिवसैनिक शिंदे गटात सामील

News Desk

दाढी करण्यासाठी तीन लाखाचा वस्तारा, व्यवसाय वाढविण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

News Desk