HW News Marathi
महाराष्ट्र

बंजारा समाजाचा २७ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा धडकणार

नांदेड | पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच ठरवतील, अशी प्रतिक्रिया बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली आहे. ते नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर अनेक गोष्टी उलगडत आहेत. आणि राजकिय वातावरण खवळून निघाले आहे.

यावेळी त्यांना संजय राठोड यांच्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली असता, हरिभाऊ राठोड यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे. त्या अहवालाच्याआधारे मुख्यमंत्री पुढची कारवाई करतील. मंत्री संजय राठोड यांच्याबाबत जितकी माहिती माध्यमांना आहे तितकंच मलाही माहिती असल्याचे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले आहे.

बंजारा समाजाकडून येत्या २७ तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती हरिभाऊ राठोड यांनी दिली. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ या कादंबरीवर बंदी घालावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘हिंदू’ या कादंबरीत बंजारा समाजाबाबत आक्षेपार्ह लिखाण आहे, त्यामुळे या कादंबरीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याचे राठोड यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगावात खडसे-फडणवीसांची भेट, चर्चादरम्यान महाजन उपस्थित

News Desk

मी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा…

News Desk

#Vidhansabha2019 : राज्यात महायुतीला अभूतपूर्व विजय मिळणार !

News Desk