HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

बारामतीमध्ये १६ जुलैपासून १० दिवस लॉकडाऊन !

बारामती | साताऱ्या पाठोपाठ आज बारामतीमध्ये देखील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेत १६ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. सुरुवातीचे ४ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. या लॉकडाऊनची ३ टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे.

बारामतीत आज (१४ जुलै) जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत कोरोनासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत १६ जुलै ते २६ जुलै या कालावधीत लॉकडाऊन पाळण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार, हा लॉकडाऊन तीन टप्प्यात राबवला जाणार आहे. दरम्यान, शहरात लॉकडाऊन होत असला तरी ग्रामीण भागासह एमआयडीसीतील कंपन्यांवर कोणतेही निर्बंध लावले जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

 

Related posts

कुणी चंपा म्हणतो, कुणी टरबूज्या म्हणतो हे खपवून घेतले जाणार नाही – चंद्रकांत पाटील

News Desk

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल हा भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न !

News Desk

फोन टॅप होत आहेत, ‘हे’ मला आधीच माहिती होते !

अपर्णा गोतपागर