बारामती | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे त्यामूळे चिंतेचे वातावरण तर आहेच. मात्र, दुसरीकडे काही गावे, जिल्हे, राज्य हे कोरोमुक्त होत आहेत. बारामतीत एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाली आणि बारामतीतही करोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर आरोग्य यंत्रणनेनेप्रयत्न करत शेवटी बारामतीही कोरोमामुक्त झाला आहे.
बारामतीती कोरोनाला आळा घालण्यासाठी बारामती पॅटर्नही राबवण्यात आला होता. सर्व नागरिकांनी केलेले सहकार्य आणि डॉक्टर, नर्स, प्रशासन, पोलिस यांच्या मदतीने अखेर बारामतीततून कोरोना गेल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांचे आभारही मानले आहे. तसेच, माम बारामतीकरांनी ‘लॉकडाउन’चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यानं हे शक्य झालं आहे. त्यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो! अशाच पद्धतीनं महाराष्ट्रसुद्धा लवकरच करोनामुक्त होईल, असा मला विश्वास आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
'कोरोनामुक्त बारामती'चं सर्व श्रेय हे डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, नगर परिषद,सर्व नगरसेवक,ग्राम प्रशासन व पदाधिकारी यांना जातं.अनेक सामाजिक संस्थांनी देखील या लढाईत हातभार लावला. तमाम बारामतीकरांनी 'लॉकडाऊन'चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यानं हे शक्य झालं आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 30, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.