HW News Marathi
महाराष्ट्र

आमदारांचे ऐतिहासिक फोटोसेशन ‘हा’ नेता मात्र गैरहजर

नागपूर | हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. सरकारचे यंदाचे हे अधिवेशन फक्त सहाच दिवसांचे आहे. गेल्या ४ दिवसांपासून अनेक मुद्द्यावर गाजलेले हे अधिवेशन आता अगदी अंतिम टप्प्यात आले आहे. आज (२० डिसेंबर) अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट दिली. दीक्षाभूमीवर जाऊन वंदन केले. यावेळी तिथे उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा दिल्या. मुख्यमंत्री ठाकरें यांच्यासोबत अनेक आमदारांनीही दीक्षाभूमीला भेट दिली. याप्रसंगी दर्शनासाठी आलेले नागरिक, चिमुकल्यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर या चौदाव्या विधानसभेच्या सदस्यांनी एकत्र येत संयुक्तरित्या ऐतिहासिक छायाचित्र काढले. या ऐतिहासिक चित्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचे जवळजवळ सर्व आमदार उपस्थित होते. मात्र, या फोटोमध्ये भाजपच्या अनेक आमदारांनी अनुपस्थिती दर्शवली आहे. हे ऐतिहासिक छायाचित्र काढताना माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थितीती सर्वांच्या नजरेत आली. देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे आणि महाविकासाआघाडीवर अत्यंत तीव्रपणे टीका करताना दिसून आले आहेत. मात्र आजच्या ऐतिहासिक फोटोमध्ये त्यांची अनुपस्थितीती अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.
महाराष्ट्र सरकारची वर्षातून ३ अधिवेशने होतात, यांपैकी हिवाळी अधिवेशन नागपूरला तर बाकी २ अधिवेशने ही मुंबईला होतात. अधिवेशनाचा कामकाज गेल्या ५ दिवसांपासून सुरू आहे, मात्र अनेक आरोप- प्रत्यारोपांमुळे अधिवेशन चर्चेत आहे. सगळे हेवेदावे विसरून आज सर्व आमदारांनी एकत्रितपणे फोटोसेशन केले , मात्र फडणवीसांनी दांडी मारली
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2024 पर्यंत शिवसेना कुठेच ठेवणार नाही ,56 संपवायला कितीसा वेळ लागतो ? निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

News Desk

गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणबंदी घातली तर…राणेंचा सरकारला इशारा !

News Desk

Live Update : पुढची रणनीती सविस्तर चर्चेनंतर ठरविणार | महाआघाडी

News Desk