HW News Marathi
महाराष्ट्र

Belgaum Bypoll Result : बेळगाव पोटनिवडणूकीत भाजप जागा राखणार, की शुभम शेळके बाजी मारणार?

बेळगाव | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज (२ मे) जाहीर होणार आहेत. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लागलेल्या या पोटनिवडणुकीत एकीकडे भाजपने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली आहे, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे. त्यामुळे या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजप असेही पाहिले जात आहे.

याशिवाय काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांच्यासह १० जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेळगावसह कर्नाटकातील १५ पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, शुभम शेळकेच्या प्रचारासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरही बेळगावात गेल्या होत्या.

कोण होते सुरेश अंगडी?

सुरेश अंगडी यांनी सलग चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २००४ मध्ये ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते, त्याचवेळी पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. तत्कालीन खासदार अमरसिंग पाटील यांचा पराभव करून अंगडी लोकसभेवर निवडून गेले होते.

सुरेश अंगडी यांच्या विजयात मराठी मतांचा वाटा सर्वाधिक होता. २००४ पाठोपाठ २००९ आणि २०१४मध्येही त्यांना मराठीबहुल भागात सर्वाधिक मते मिळाली. २०१९ मध्ये मराठीबहुल भागात त्यांचे मताधिक्‍य कमी होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात असताना उलट त्यांचे मताधिक्‍य वाढले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उद्धवजी, कायदा-सुव्यवस्था बिघडतेय, विशेष अधिवेशन बोलवा’ – भगतसिंग कोश्यारी

News Desk

मोदींनी आंदोलनजीवी म्हटल्यानंतर नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

News Desk

अदार पुनावला यांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकी दिली ? नेमकं काय आहे सत्य ?

News Desk