HW News Marathi
Covid-19

खुशखबर ! उद्यापासून सर्वसामान्यांसाठीही धावणार बेस्ट बस

मुंबई | मुंबईला कोरोनाने आपल्या विळख्यात घट्ट बांधले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन ५ हा ३० जूनपर्यंत सुरू आहे. मात्र, हळूहळू काही नियम शिथिल करण्यात येत आहेत. ठाकरे सरकारच्या मिशन बिगिन अगेननुसार मुंबईतील सर्व सामान्यांचे जनजीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी बेस्टने देखील कंबर कसली असून उद्यापासून बेस्टच्या बस सर्वसामान्यांसाठी धावण्यास सुरुवात होणार आहे.

लॉकडाऊनमुळे या आधी मंत्रालय व अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी बेस्टच्या फेर्‍या सुरु होत्या. सध्या, दीड हजार बसच्या फेर्‍या सध्या सुरु आहेत. सोमवारी त्यात २३०० पर्यंत वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे बसच्या या सेवेमुळे आता मुंबईकरांचे जनजीवन नक्कीच हळूहळू पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह राज्यासमोर आता चक्रीवादळाचे संकट

News Desk

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मिलेनिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण 

News Desk

चिंताजनक! राज्यात आज एका दिवसात सर्वाधिक १७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk