HW News Marathi
महाराष्ट्र

बेस्टच्या कंडक्टरला कोरोनाची लागण, परळ बेस्ट वसाहत पोलीसांनी केली सील

मुंबई | राज्यात कोरोनाचा विळखा हा तासागणिक वाढत आहे. आज (७ एप्रिल) परळ येथील बेस्ट वसाहतीत ३ जणांना कोरोनाची लागम झाल्याचे वृत्त ताजे असतानाच आता बेस्टमधील आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. बेस्ट कंडक्टरला कोरोनाची बाधा झाली असताना हा रुग्ण ऑनड्यूटी होता. त्यामुळे ड्यूटीवर असताना तो कोणत्या मार्गावर गेला कोणाच्या संपर्कात आला याचा शोध सुरु आहे. दरम्यान, तेव्हा बसवर जो ड्रायव्हर होता त्यालाही क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

बेस्टच्या या कंडक्टरला लागण झाल्याने परळ येथील बेस्ट वसाहत पोलीसांनी सील केली आहे. तसेच, त्यांच्या घरच्यांनाही क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच, हा रुग्णाला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. खबरदारी म्हणून पोलीस ज्या भागात जास्त रुग्ण आढळत आहेत त्या भागाला तात्काळ सील करत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#COVID19 : ३३ नव्या रुग्णांची भर, राज्यात कोरोना बाधितांची संख्या ७८१ वर

News Desk

MPSC बाबत मुख्यमंत्री लवकरचं मोठी घोषणा करणार!

News Desk

गावी चालत जाणाऱ्यांना टोलनाक्यांवर अन्न-पाणी पुरवा, नितिन गडकरींची मागणी

swarit