HW News Marathi
महाराष्ट्र

भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

मुंबई | महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भाजपचे ज्येष्ठ नेते भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे. ३० ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सी. विद्यासागर राव यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ ३० ऑगस्ट २०१९ रोजी संपल्याने आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपद देखील भूषविले आहे.

महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या राज्यपालांच्यादेखील नियुक्ती

महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगाणा या राज्यांच्या राज्यपालांच्या देखील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कलराज मिश्रा यांची राजस्थानच्या राज्यपालपदी, बंडारू दत्तात्रय यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी, आरीफ मोहम्मद खान यांच्या केरळच्या राज्यपालपदी तर तमिलीसाई सौंदराजन यांची तेलंगणाच्या राज्यपालदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भगतसिंह कोश्यारी यांचा अल्प परिचय

उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा भगतसिंह कोश्यारी यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. २००१ ते २००२ या कार्यकाळात कोश्यारी हे उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी होते. २००२ सालापासून २००७ पर्यंत कोश्यारी यांच्याकडे उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद होते. २००८ ते २०१४पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा संताप, पडळकरांच्या पुतळ्याचे दहन

News Desk

पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होईपर्यंत पालकांकडून फी मागू नये

swarit

परमबीर सिंग यांच्या इशाऱ्याने वाझेकडून खंडणी वसुली, कार डिझायनर दिलीप छाबरियांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk