HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत तुमच्या आहेत त्या जागा वाचवून दाखवा !भाई जगतापांचं भाजपला चॅलेंज

मुंबई | मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभमीवर भाई जगताप यांची नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. काँग्रेसच्या उभारीसाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. दरम्यान, भाई जगताप यांनी नियुक्ती होताच भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना ओपन चॅलेंज दिले आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना भाई जगताप यांनी फडणवीस आणि भाजपला खुले आव्हान देत म्हटलं आहे की,’मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तुमच्या जितक्या जागा आहेत त्या वाचवून दाखवा’ असे थेट आव्हान भाई जगताप यांनी दिले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामूळे भाई जगताप यांच्या या चॅलेंजचे उत्तर भाजपकडून आणि फडणवीस यांच्याकडून काय येणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांना संकटकाळी जाग असतेच, चंद्रकांत पाटील दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा | सामना

News Desk

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, NDRF पथकांना सज्ज ठेवा! – मुख्यमंत्री

Aprna

विकास कामांचा बोलाचा भात बोलाची कढी! – भालचंद्र शिरसाट

Aprna