HW News Marathi
महाराष्ट्र

‘कृषी कायद्यांविरोधात विविध मागण्यांसाठी 27 सप्टेंबरला भारत बंद!’

नवी दिल्ली। देशात कृषी कायद्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही. अनेक शेतकरी अजूनही आंदोलन करत आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून कृषी कायदे तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांना घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली. टिकैत यांच्या या घोषणेनंतर आता केंद्र सरकारच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या

शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी आणि केंद्रामध्ये अनेकदा चर्चा झाल्याची समोर येतंय, मात्र हाती काहीच लागलं नाही. केंद्राने लागून केलेल्या कृषी कायद्यांना परत घ्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. या मुद्द्यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, या चर्चांतून कोणताही ठोस मार्ग निघालेला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाने जोर पकडला आहे. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेस टिकैत उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मेळावे भरवत आहेत. तसेच या महापंचायतीमध्ये राकेश टिकैत केंद्र सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत.

जानेवारीपासून सरकारने आमच्याशी संवाद साधणं बंद

उत्तर प्रदेशातमधील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये आज (५ सप्टेंबर) शेतकऱ्यांची महापंचायत भरवण्यात आली आहे. यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ‘मागील नऊ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बललेले आहेत. या वर्षाच्या जानेवारीपासून सरकारने आमच्याशी संवाद साधणं बंद केलेलं आहे. देशाची संपत्ती विकणाऱ्यांना आपण ओळखलं पाहिजे. फक्त उत्तर प्रदेशच नव्हे तर उत्तराखंड तसेच संपूर्ण देशात अशा सभा आणि बैठका घेतल्या पाहिजेत. देशात रेल्वे, जहाज आणि विमानतळं विकले जाणार आहेत,’ असे राकेश टिकैत म्हणाले आहेत.

27 सप्टेंबर रोजी भारत बंद

महापंचायतीदरम्यान राकेश टिकैत एखादी मोठी घोषणा करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. टिकैत यांनी कृषी आंदोलनबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी येत्या 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. याआधी किसान मोर्चाने 25 सप्टेंबर रोजी भारत बंद करण्यात येईल असे सांगितले होते.

पिकाला भाव नाही, तर मत नाही

शेतकरी मोर्चाने आयोजित केलेल्या आजच्या महापंच्यातीला हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. मुजफ्फरनगर येथील मैदान आज खचाखच भरलेले होते. यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर निवडणुकीत मतदानही मिळणार नाही, असे सांगितले. “ही लाढाई ही कृषी कायदे आणि किमान आधारभूत किंमत यासाठी आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकरी मतदान करणार नाहीत. आता मतदानाच्या माध्यमातून आपल्याला घाव घालावा लागेल,” असे टिकैत म्हणाले आहेत.

शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देणं मी पाळलं

शरद पवार यांनी थेट मोदी सर्कावर हल्ला चढवत त्यांच्यावर टीका केली आहे. “तोडणीचा खर्चही निघत नसून शेतकरी पीक फेकून देत आहेत. कांद्याचा खर्चही निघत नसून अन्य गोष्टींनाही किंमत मिळत नाहीये. माझ्याकडे १० वर्षीय केंद्रीय कृषी खातं होतं. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देणं यावेळी मी कटाक्षाने पाळलं. यामुळे शेतकरी या देशाची भूक भागवतोच, मात्र संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवण्याची कामगिरी करु शकतो. शेतकऱ्यांनी हे करुन दाखवलं आहे,” असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं. “पण दुर्दैवाने केंद्र सरकारमध्ये यासंदर्भात गरज आहे तितकं लक्ष दिलं जात नाही आहे. त्यामुळे शेतमालाच्या किंमती घसरताना दिसत आहे,” असा आरोपही यावेळी शरद पवारांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जमाफीच्या रकमेसाठी शेतक-यांना दिवाळीची वाट पहावी लागणार

News Desk

‘अजित पवारांनी पुण्याची वाट लावलीय’, निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्ला

News Desk

भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं, अनिल परब यांचा विरोधकांना पलटवार

News Desk