HW News Marathi
महाराष्ट्र

भाईंदर मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव देणार | मुख्यमंत्री

ठाणे | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा- भाईंदरमधील लोकांना एक खुशखबर दिली आहे. आपण दिलेल्या वचनांची पूर्तता करीत असून नुकतीच भाईंदरमध्ये मेट्रोसाठी मान्यता दिलेली आहे. कस्तुरी गार्डन परिसरातील प्रस्तावित मेट्रो स्थानकाला महावीर स्वामी स्थानक असे नावही देण्यात येईल, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आचार्यजींच्या १०० व्या वाढदिवशीदेखील ते आमच्यासोबत असावेत. समाजसेवा आणि राष्ट्रसेवा या विषयांमध्ये आचार्य श्री पद्मसागरसुरीश्वरजी महाराज यांनी जे अतुल्य कार्य केले आहे ते आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. देशाच्या प्रगतीत त्यांचे अमुल्य योगदान असलेल्या या समाजाने जेवढे लोकांकडून घेतले आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त समाजाला परत दिले आहे.

कस्तुरी गार्डन येथे राष्ट्रसंत आचार्य श्री पद्मसागरसुरीश्वरजी महाराज यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मोर्चे, आंदोलने तसेच इतरही अनेक समस्या असताना अतिशय संतुलितरित्या कारभार चालविला आहे व राज्याला प्रगतीकडे नेले आहे याबद्धल आचार्य नयपद्मसागरजी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमधील २-४ जणांचं मानसिक संतुलन ढासळलंय, त्यातलेच एक पडळकर ! मिटकरींचा घणाघात

News Desk

अखेर खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा मुहूर्त ठरला!

News Desk

मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील सुनावणी १७ मार्चला होणार

swarit