HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

Bhima Koregaon : गौतम नवलखा, डॉ. आनंद तेलतुंबडेंचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

मुंबई | कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा  आणि प्राध्यापक डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. नवलखा आणि तेलतुंबडे आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून ४ आठवड्यांचा दिलासा देण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणी पुणे पोलिसांनी नवलखा व तेलतुंबडे यांच्यावर २०१८ ऑगस्टमध्ये गुन्हा नोंदविला. या दोघांनी गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिल्यानंतर नवलखांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. तर तेलतुंबडे यांनी आधीच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

Related posts

आदिवासींच्या हितासाठी ओडिसा सरकारने निवडणुकांची वाट पाहू नये !

News Desk

कृषी क्षेत्रातला विकास पाहायला बारामतीला या

News Desk

फडणवीस दिल्लीश्‍वरांचे पाय चाटतात | विनायक राऊत

News Desk