HW News Marathi
महाराष्ट्र

Bhima Koregaon : भीमा कोरेगाव लढाईचा इतिहास 

२०१८ च्या सुरुवातीला महाराष्ट्रात झालेल्या भीमा कोरेगाव दंगलीचे पडसाद वर्षभर उमटलेले पहायला मिळाले. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे १ जानेवारी २०१८ ला पुण्याजवळ असलेल्या भीमा कोरेगाव येथे दंगल झाली. सालाबादाप्रमाणे या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनेक दलित बांधव एकवटले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागले. २०१८ ला भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईला २०० वर्षे पुर्ण झाली होती.

जाणून घेऊया नक्की काय आहे भीमा कोरेगाव लढाईचा इतिहास

भिमा कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती.ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन करीत होता तर मराठा साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे ५०० महार सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत त्यामुळे महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. या युद्धात पराभूत झाल्यामुळे मराठा साम्राज्याचा अस्त झाला.

कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहिद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.

महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध, दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमुर्ती व डॉ. आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहिद सैनिकांच्या विजयस्तंभाला मानवंदना दिली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दाभोळकर हत्या प्रकरण | आणखी तिघेजण ताब्यात, स्फोटकांचा साठा जप्त

swarit

अर्णब गोस्वामींना तुरुंगात खडी फोडण्यासाठी इतके पुरावे खूप – प्रशांत भूषण 

News Desk

भरदिवसा काँग्रेस प्रवक्ता विकास चौधरींची गोळ्या झाडून हत्या

News Desk