HW News Marathi
महाराष्ट्र

‘तुमच्यासारखे खोटे आरोप करुन बाकीचे धंदे केले नाहीत’, भुजबळांचं सोमय्या यांना प्रत्युत्तर!

मुंबई। महाविकास आघाडी सरकारमधील एका पाठोपाठ एका मंत्र्यावर गंभीर आरोप होत आहेत. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगशी त्यांचा संबंध काय? असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपांना आता भुजबळांनीही प्रत्युत्तर दिलंय.

सोमय्या यांच्या आरोपात काडीमात्र तथ्य नाही

गेल्या चार पाच वर्षापूर्वीच त्यांनी आमच्यावर आरोप केले. ईडीला कळवलं. त्या प्रॉपर्टी अटॅच करायला लावल्या. आज दाखवलेली जमीन आहे ती नाशिकपासून 20 किमी लांब एक लहानसा रस्ता होता. त्यावेळेला 1980 मध्ये घेतलेली जमीन आहे. त्यांनी आज शिळ्या कडीलाच उत आणायचा प्रयत्न केला आहे. या सगळ्याबाबत आता सेशन कोर्ट आणि हायकोर्टात केस सुरु आहे. त्या केसेसवर प्रभाव टाकण्याचा त्यांचा हेतू आहे की काय? मला माहिती नाही. आमच्या न्याय देवतेवर विश्वास आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कोर्टात लढत आहोत. त्यामुळे मी याबाबत जास्ती बोलणार नाही. एवढंच सांगेन की त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काडीमात्र तथ्य नाही’, असा दावा भूजबळांनी केलाय.

पण तुमच्यासारखे खोटे आरोप करुन बाकीचे धंदे केले नाहीत आम्ही

‘मुंबईतील घराबाबत केलेल्या आरोपांवरही भुजबळ यांनी उत्तर दिलंय. ते जुनं घर होतं. ते पाडून त्यावर 2.5 एफएसआय मिळतो. पुनर्बांधणीच्या स्किममधली ती इमारत आहे. त्यातील अर्ध माळे मूळ मालकाला द्यायचे आहेत आणि अर्धे आमच्याकडे राहणार आहेत. कोर्ट कचेऱ्या चालू असल्यामुळे सध्या ते ठप्प आहे’.त्यांचं हे कामच आहे की वारेमार आरोप करायचे. आमचं वय 75 आहे. त्यावेळी कधी लहान असताना 10 हजार, 15 हजार रुपये एकरनं घेतलेल्या जागा आहेत. त्याचा आता भाव वाढला आणि ते आता तुम्ही सांगता. जणू काही आम्ही 75 वर्षे काय घरातच बसलो होतो काय बोळ्यानं दूध पित? काही काम धंदा आम्ही पण केला आहे ना. अजूनही आमचे काही बिझनेस सुरु आहेत. पण तुमच्यासारखे खोटे आरोप करुन बाकीचे धंदे केले नाहीत आम्ही’, असा टोलाही भुजबळ यांनी सोमय्यांना लगावलाय.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हवं तर आम्ही तुमच्यासोबत राज्यपालांकडे येतो, पण दिखावू आणि फसवणूक करणारा अध्यादेश काढू नका: फडणवीस

News Desk

हिंगणघाट जळीत कांडातील पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी

swarit

माझ्यावरच्या ‘त्या’ जीवघेण्या हल्ल्याच्या कटात जयंत पाटील सामील! – गोपीचंद पडळकर

News Desk