HW News Marathi
देश / विदेश

मोठी बातमी ! विशेष न्यायालयाकडून सचिन वाझेंना १० दिवसांची NIA कोठडी

मुंबई | राज्यासाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात चर्चेत आलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे यांना NIA च्या विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, आता २५ मार्चपर्यंत NIA कडून सचिन वाझे यांनी कसून चौकशी होणार आहे.

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीप्रकरणी आरोप झालेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर शनिवारी (१३ मार्च) रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी NIA कडून अटक करण्यात आली होती. तसेच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मूळ मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणाने काहीच दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती.

NIAच्या वकिलांनी सचिन वाझे यांची १४ दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. यापूर्वी शनिवारी NIA ने सचिन वाझे यांनी तब्बल १३ तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर NIAने सचिन वाझे यांना अटक केली होती. वाझेंचा या हत्या प्रकरणात सहभाग असावा असा संशय मनसुख हिरेन यांच्या पत्नीविमला हिरेन यांनी ATS कडे व्यक्त केला आहे.त्यामुळे या प्रकरणातही सचिन वाझे अडचणीत सापडले आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोगासमोर शिवसेना आणि धनुष्यबाणावर होणार सुनावणी

Aprna

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदीला ट्विटरवरून धमकी

News Desk